कोरोना रिकव्हरीत कोल्हापूर जिल्हा तिसरा

corona virus

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णांपैकी धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ९६.३१, वाशीम ९५.८० तर कोल्हापूर ९५.७९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विळखा सैल झाला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाबाधित संख्या एकेरी होती. मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. तब्बल ४९१ बाधितांची नोंद झाली . जून महिन्यात कोरोना बाधितांची संख्या ३७८ अशी होती. मात्र जुलैनंतर कोरोनाचा कहर सुरू झाला. जुलैमध्ये ४ हजार ८४८, ऑगस्ट १७ हजार २०८, सप्टेंबर २१ हजार ७५० होती. ऑक्टोबर ३ हजार ४६० बाधितांची नोंद झाली. ऑक्टोबरनंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत गेली. नोव्हेंबरमध्ये ८३३ तर डिसेंबर १४ पर्यंत २४५ बाधित रुण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आँक्टोबरनंतर कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले तर संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित ४९ हजार २९८ होते तर कोरोनामुक्त ४७ हजार ४७७ स्थानावर पोहचला आहे. आजपर्यंत १ हजार ६९२ मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ३.४३ टक्के आहे. गेल्या दीड महिन्यापासून नियमित होणारे मृत्यू घटलेले आहेत. बरे फायदा होत आहे. जनजागृतीबरोबर दंडात्मक कारवाई, नागरिकांचे सहकार्य यामुळेच कोरोनाची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

कोरोना रिकव्हरी रेट जिल्हे

  • धुळे : ९६.३१
  • वाशीम : ९५.८०
  • कोल्हापूर : ९५.७९
  • नाशिक : ९५.६८
  • जालना : ९५.६७
  • पालघर : ९५.३२

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER