कोल्हापूर जिल्ह्यात ५६ हजार ३९४ पूरग्रस्तांची संक्रमण शिबिरात सोय – जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

Daulat desai

कोल्हापूर :- पूरग्रस्तांसाठी जिल्ह्यात 181 संक्रमण शिबिर सुरु करून त्यामध्ये 56 हजार 394 लोकांची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील 181 संक्रमण शिबिरातील 56 हजार 394 लोकांची तालुकानिहाय माहिती अशी- शिरोळ तालुक्यातील 102 संक्रमण शिबिरामध्ये 33 हजार 681 लोकांची सोय करण्यात आली आहे. करवीर ग्रामीणमध्ये 5 संक्रमण शिबिरामध्ये 211 लोकांची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर विभागात 12 संक्रमण शिबिरामध्ये 726 लोकांची सोय करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील 14 संक्रमण शिबिरामध्ये 4 हजार 201 लोकांची सोय करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरामध्ये 48 संक्रमण शिबिरामध्ये 17 हजार 575 लोकांची सोय करण्यात आली आहे. संक्रमण शिबिरातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबरोबरच पाणी, आरोग्य अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.