
सांगली : कोल्हापूर-धनबाद साप्ताहीक एक्स्प्रेस कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. कोल्हापूर-धनबाद साप्ताहीक एक्स्प्रेस १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे प्रवास वेळेत दहा तासांची बचत होणार आहे.
या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, नांदेड, अदिलाबाद, नागपूर, इटारसी इत्यादी मार्गे धावणार आहे. त्यामुळे गाडीच्या प्रवासी वेळत १० तासात बचत होणार असून ५० तासात ही गाडी धनबाद येथे पोहोचणार आहे.
ही गाडी कोल्हापूर येथून दि. १९ पासून पहाटे ४.३५ वाजता सुटेल. मिरजेत ही ५.३० वाजता पोहचेल. त्यानंतर ती ५.३५ वाजता पुढे रवाना होईल. धनबाद येथे तिसर्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहच होईल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. २२ पासून धनबाद येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. मिरजेत तिसर्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता येईल व कोल्हापूर येथे दुपारी १२.४० वाजता पोहोचेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला