भाविकांची धार्मिकस्थळी गर्दी

Crowd of devotees at religious places

कोल्हापूर : कोरोना (Corona) महामारीमुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अवकळा आलेले पर्यटन आता हळूहळू बहरू लागले आहे. अनलॉकनंतर मंदिरे आणि पर्यटनस्थळे खुली झाल्याने भाविकांची पावले मंदिरांच्या गाभाऱ्यात पडू लागली आहेत. पर्यटन व्यवसाय गतिमान होऊ लागला आहे. त्यासोबतच पूरक व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. राज्यभरातील मंदिरांचे परिसर गजबजू लागले आहेत. धार्मिक पर्यटनाबरोबरच अन्य पर्यटनांमुळे व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

कोरोनामुळे पर्यटनाला खिळ बसली. त्यामुळे जनजीवनच ठप्प झाले. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाळी पर्यटन आणि जून ते ऑगस्टदरम्यानचा पावसाळी पर्यटन हंगामही वाया गेला. या काळात सुमारे पाच हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. आता हळूहळू पर्यटन व्यवसाय उभारी घेऊ लागला आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. करवीर निवासिनी अंबाबाई, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, जोतिबा व नृसिंह मंदिरांसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कोकणातील सुमारे 3024 मंदिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खुली केली. तुळशी विवाहानंतर सुरू झालेल्या लग्नसराईमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER