कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला

Kolhapur

कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रस्ताव शुक्रवारी नगरविकास विभागाकडे पाठवला. या प्रस्तावात शहर परिसरातील १८ गावांसह दोन्ही एमआयडीसींचा समावेश करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शहर हद्दवाढीचा चेंडू आता राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे.

कोल्हापूर नगरपालिकेची महापालिकेत रुपांतर करताना बेबी कार्पोरेशन म्हणूनच अस्तित्वात आली. कोल्हापूरची हद्दवाढ स्थापनेपासून कसूभरही वाढली नाही. हद्दवाढीने ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरांनी विकास साधला. कोल्हापूर महापालिका अस्तित्वात येताना, राज्य शासनाने शहराचा केंद्रबिंदू धरून २२ किलोमीटरपर्यंत हद्दवाढ करावी असे स्पष्ट केले होते. हद्दवाढीशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. हद्दवाढ रखडल्याने शहर एक मोठ खेडं बनले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हद्दवाढीची मागणी आहे.

दरम्यान, मागील महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, तसा प्रस्ताव पाठविण्याची सुचना महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाला पाठवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER