कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सची निवडणूक बिनविरोध

Kolhapur Chamber Of Commerce

कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीच्या रिंगणातील २७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने विद्यमान अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह २३ संचालकांची नावे निवडणूक अधिकारी, अ‍ॅड. दीपक देसाई यांनी जाहीर केली. नगरसेवक तौफिक मुल्लाणी, विद्यानंद मुंढे, प्रशांत शिंदे आणि अजित कोठारी या चार जणांना संस्थेवर नव्याने प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

मित्राचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

त्रैवार्षिक निवडणुकीसाठी २३ जागांसाठी ५० अर्ज आले होते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. विद्यमान अध्यक्ष संजय शेटे, आमदार चंद्रकांत जाधव, आनंद माने आणि प्रदीप कापडिया यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. व्यापारी गटात १० जागांसाठी २५ अर्ज आले होते. त्यापैकी १५ जणांनी माघार घेतली. उद्योग-संस्था गटातील पाच जागांसाठी ११ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी सहा जणांनी अर्ज मागे घेतले. संलग्न सभासद गटातून तिघांनी, कार्पोरेट गटातून एकाने तर सहमानद सभासद गटातून दोघांनी माघार घेतली.

निवडून आलेले संचालक :

  • संलग्न संस्था गट : संजय शेटे, आनंद माने, प्रदीप कापडिया, शिवाजीराव पोवार, प्रशांत शिंदे.
  • औद्योगिक संस्था गट : आमदार चंद्रकांत जाधव, योगेश कुलकर्णी, विजय मेनन, राजाराम पाटील, विद्यानंद मुंढे.
  • व्यापारी संस्था गट : जयेश ओसवाल, प्रकाश केसरकर, शिवाजीराव जगदाळे, अजित कोठारी, हरिभाई पटेल, राहुल नष्टे, धनंजय दुग्गे, संजय पाटील, भरत ओसवाल.
  • कार्पोरेट गट : ललित गांधी, दिलीप मोहिते.