अंबाबाई मंदिरात काकड्यास प्रारंभ

Ambabai Temple - Kolhapur

कोल्हापूर : कार्तिक महिना म्हणजेच दीपावलीची (Diwali) सुरुवात. पहिल्याच दिवशी अंबाबाईच्या (Ambabai Temple) मुख्य शिखरावर पश्चिमेकडील बाजूला पहाटे तीन वाजता कापूर प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. यास काकडा म्हणतात. आज दिवाळीच्या पहाटे काकडा प्रज्वलित झाल्यानंतर देवीचा मुख्य गाभारा उघडून चार वाजता काकड आरती झाली. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा काकडा चालतो. या दिवसात देवीच्या नित्योपचारात थोडा बदल असतो. सव्वादहा वाजता होणारी शेजारती सव्वा नऊ वाजता होते. दिवाळी निमीत्त मंदिर पहाटे लवकर उघडते तर लवकर बंद होते.

देवीचा दर शुक्रवारी साडेनऊ वाजता होणारा पालखी सोहळा या काल पावणे नऊ वाजता झाला.आज पहाटेच्या मंद उजेडात बोचऱ्या थंडीत काकडा प्रज्वलित होत असताना सनई व नगारा यांचे वादन व घाटी दरवाजावरील मोठ्या घाटीचा घंटानाद चालू होता.

शिखराकडे पाठ करून एका हातात प्रज्वलित केलेला काकडा घेऊन कोणत्याही आधाराशिवाय शिखरापर्यंत वर चढणे व परत खाली उतरणे. देवीची ही काकड्याची सेवा तिच्या पोटी असणाऱ्या निस्सीम भक्ती शिवाय सहज शक्य नाही अशी भावना भक्तांमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER