कोल्हापूर – अहमदाबाद विमानसेवा सुरू

Kolhapur - Ahmedabad flight resumed

कोल्हापूर : अहमदाबाद या नवीन विमान वाहतूक सेवेला आजपासून सुरुवात झाली. या विमानसेवेचे पहिले प्रवासी बनण्याचा मान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना मिळाला. पहिल्या दिवशी ५४ जणांनी प्रवास केला. खासदार संजय मंडलिक यांनी ध्वज दाखवल्यानंतर ही सेवा सुरू झाली. आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ संचालक कमल कटारिया, ह्यइंडिगोल्लचे व्यवस्थापक विशाल भार्गव, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य अमर गांधी, विज्ञान मुंडे, विजय अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या फेरीसाठी ५४ प्रवाशांनी नोंदणी केली होती. यावेळी खासदार संजय मंडलिक आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पहिल्या विमान फेरीतील प्रवाशांना शुभेच्छा देत कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER