नवी दिल्लीतील निजामुद्दीन मेळाव्याला कोल्हापुरतून 21 उपस्थित : चिंता वाढली

Kolhapur-21 attendees at Nizamuddin rally in New Delhi

कोल्हापूर : नवी दिल्लीत झालेल्या तबलीग जमात मेळाव्यामुळे देशभर कोरोनाचा फैलाव होईल अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकीकडे देशभर लॉकडाउन व संचार बंदी लागू असताही नवी दिल्लीत तबलीग जमाततर्फे धार्मिक मेळावा झाला या मेळाव्याला 16 देश व देशातील 19 राज्ये येथून हजारो भाविक उपस्थित होते.या भाविकातून देशभर कोरोंनाच संसर्ग होईल अशी भीती व्यक्त होत आहे.या मेळाव्याला कोल्हापुरतून 21 भाविक उपस्थित होते,असे आढळून आले आहे.त्यांचे तातडीने क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दिल्लीतील धार्मिक मेळाव्याला कोल्हापूर परीक्षेत्रातील सुमारे 56 भाविक उपस्थित होते अशी माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्लीत झालेल्या तबलीग जमात मेळाव्याला उपस्थित भविकापैकी 440 हून अधिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.तसेच दिल्लीतील कोरोना बाधित लोकापैकी 24 जण तबलीग जमात मेळाव्याला उपस्थित होते.असे आढळून आले आहे.या मेळाव्याला उपस्थित किमान आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे.या मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील 21,सांगलीतील तीन,सातारा येथील पाच,सोलापूर ग्रामीण भागातील नऊ तसेच पुणे ग्रामीण मधील 19 भाविक उपस्थित राहिल्याची माहिती पुढे आली आहे.त्यामुळे या परिसरात कोरोंनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते.

दिल्लीतून परतलेल्या ४७ जणांची तपासणी