कळंबा कारागृह की गुन्हेगारीचा अड्डा?कैद्यांकडून अनेक मोबाईल फोन जप्त

कोल्हापूर: कळंबा मध्यवर्ती कारागृहात (kalamba-central-jail) पुन्हा एकदा दोन मोबाईल, सिम कार्ड आणि बॅटरी आढळून आली आहे. मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या 5 जणांकडून मोबाईल फोनचा वापर सुरु असल्याचं बराक झडतीत उघडकीस आलं आहे. रिकाम्या दुधाच्या पिशवीत गुंडाळून हे मोबाईल शौचालयाच्या पाण्यात ठेवले जात असल्याचा संशय कारागृह पोलिसांना आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून यापूर्वीही अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांत आतापर्यंत 4 घटनांमध्ये एकूण 15 मोबाईल कारागृह पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा पुन्हा चव्हाटयावर आली आहे .

डिसेंबर 2020 च्या शेवटी कळंबा कारागृहात पाऊण किलो गांजासह 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह असलेले तीन पॅकेट असा 15 हजाराहून अधिकचा मुद्देमाल कारागृह पोलिसांना मिळाला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासन खडबडून जागं झालंय. एका गाडीमधून आलेल्या दोघांनी हे पॅकेट 22 डिसेंबरच्या मध्यरात्री कारागृहात फेकल्याची माहिती पुढे येतेय. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER