कोल्हापूर : गेल्या २४ तासांत १८ नवे रुग्ण

कोल्हापूर :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  कोरोनाचे नवे १८ रुग्ण आढळून आले आहेत. तर तिघे जण कोरोनामुक्त झाले. इचलकरंजीत आणखी पाच रुग्णांची भर पडली आहे, तर आजरा तालुक्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९८४ वर गेली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९७७ पॉझिटिव्हपैकी ७४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २१६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद जिल्ह्यात ३१२८ रुग्णांवर उपचार सुरू, ७७ रुग्णांची वाढ

 नवे रुग्ण या भागातील आहेत :  आजरा- ५, भुदरगड- १, गडहिंग्लज-२ नगरपरिषद क्षेत्रातील -३ असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ९२, भुदरगड- ७७, चंदगड- १११, गडहिंग्लज- ११२, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३०, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- १२, नगरपरिषद क्षेत्र- ९२, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-५९ असे एकूण ९५७ आणि पुणे -२, सोलापूर-३, मुंबई-४, नाशिक -१, कर्नाटक-७, आंध्रप्रदेश-१ आणि सातारा-२ असे इतर जिल्हा व राज्यातील २० असे मिळून एकूण ९७७ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. पैकी ७४८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

तर एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २१६ इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER