कोहलीने सुरू केली विश्वचषकाची तयारी, आता सलामीला खेळायचा विचार

Virat Kohli

सहसा घडत नाही अशी गोष्ट अहमदाबादच्या (Ahmedabad). नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) शनिवारी घडून आली. विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुध्दच्या (England) पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात सलामीला खेळला आणि त्याने नाबाद 80 धावासुध्दा केल्या. याच्याआधी टी-20 च्या 83 डावात कोहली फक्त सात वेळा सलामीला खेळला होता आणि 2018 पासून तर तो पहिल्यांदाच सलामीला खेळत होता पण क्रम बदलला तरी त्याच्या धावा करण्यात काही फरक पडला नाही.

ते पाहता विराट कोहलीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो भारतीय क्रिकेट संघाला लाभदायक ठरणार आहे. विशेषतः येत्या आॕक्टोबरात होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय कर्णधाराचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि तो म्हणजे कोहलीने आता विश्वचषकासाठी तयारी व्हावी म्हणून यंदाच्या आयपीएलमध्येही (IPL) सलामीला खेळायची तयारी चालवली आहे. याबद्दल त्याने म्हटलेय की, संघासाठी हे सुचिन्ह (आपण सलामीला यशस्वी ठरणे) आहे आणि मला पुढे असेच खेळायला आवडेल. विश्वचषक स्पर्धेपर्यंत हा फाॕर्म टिकून राहिल अशी आशा करतो.

शनिवारी कोहलीने 52 चेंडूत 80 आणि रोहीत शर्माने 34 चेंडूत 64 धावा केल्या. या दोघांनी 9 षटकांतच दिलेल्या 94 धावांच्या सलामीवर भारताची 2 बाद 224 ही मोठी धावसंख्या रचली गेली. त्यामुळे ही कामगिरी पुढेसुध्दा कायम ठेवायची कोहलीची इच्छा आहे.शिवाय विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला आणखी काही टी-20 सामने खेळायला हवेत असे मतही त्याने मांडले आहे.

सामन्यानंतर स्टार स्पोर्टसशी बोलताना कोहलीने स्पष्टच सांगितले की हो, आयपीएलमध्ये मी सलामीला खेळणार. काय आहे ना…मी पूर्वी वेगवेगळ्या क्रमांकावर खेळलोय. पण आता आपली मधली फळी भक्कम आहे असे मला वाटतेय. आणि आता तुमच्या दोन सर्वोत्तम फलंदाजांना टी-20 सामन्यात सार्वाधिक चेंडू खेळायला मिळावेत असे मला वाटते म्हणून रोहीतसोबत आघाडीला खेळायची माझी इच्छा जरुर आहे. जर आम्ही दोघे स्थिरावलो आणि धावा केल्या तर समोरच्यांना मोठे नुकसान पोहोचणार आहे. तेच तर आम्हाला हवे आहे.शिवाय आमच्यापैकी एक जण खेळपट्टीवर असला आणि स्थिरावलेला असला तरी नंतरच्या फलंदाजांनाही विश्वास येईल आणि ते अधिक मोकळेपणाने खेळू शकतील. संघासाठी हे चांगले आहे आणि अशीच चांगली कामगिरी सुरु रहावी असे मला वाटते. विश्वचषकापर्यंत तरी हे असेच व्हावे अशी माझी इच्छाआहे.

आता विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा एकही टी-20 सामना नाही परंतू आता कोहलीने भारतीय संघासाठी विश्वचषकाआधी आणखी काही सामन्यांचे नियोजन केले जाईल असे सुतोवाच केले आहे. 14 सप्टेंबरला भारतीय संघाचा इंग्लंड दौरा आटोपल्यावर हे सामने होतील अशी शक्यता आहे. तसे झाल्यास कोहली व शर्मा जोडीला आणखी काही सामने सोबत खेळून आपसातील समन्वय चांगला करण्याची संधी मिळेल.

रोहित शर्माने मात्र विश्वचषकातील सामन्यांबाबत आतापासूनच बोलणे योग्य ठरणार नाही असे म्हटले आहे.,अजून भरपूर वेळ आहे म्हणूनत्यावेळी फलंदाजी क्रम कसा असेल हे आताच सांगणे घाईचे ठरेल. त्यावेळची परिस्थिती बघूनच ठरवता येईल असे रोहीतने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER