बाहेरच्या लोकांसारखा विचार केला तर मीसुध्दा बाहेर बसेल – विराट कोहली

Virat Kohli

वेलिंग्टन :- भारतीय संघाची विजयी वाट हरवली आहे आणि त्यासोबतच कर्णधार विराट कोहालीचाही फॉर्म हरवला आहे. न्यूझीलंडमध्ये नऊ डावात तो फक्त एकच अर्धशतकी खेळी करु शकला आहे. असे असले तरी विराट त्याबद्दल फारसा चिंतीत नाही. तो म्हणतो की, बाहेरच्या लोकांसारखा विचार केला तर मीसुध्दा बाहेर बसेल. जास्त विचार करत बसलो तर उगाच मनस्थिती खराब होते.

न्यूझीलंडच्या या दौऱ्यात विराटने टी-20 सामन्यांमध्ये 45, 11, 38 व 11, वन डे सामन्यांमध्ये 51, 15 व 9 आणि वेलिंग्टन कसोटी सामन्यात 2 आणि 19 धावांच्या खेळी केल्या आहेत.

साउथी आणि बोल्टचा विलक्षण योगायोग

याबद्दल तो म्हणतो की मी ठीक आहे. माझी फलंदाजी चांगलीच होत आहे. बहुतेकदा तुम्ही ज्या प्रकारची फलंदाजी करत असतात ती धावांच्या आकड्यांमध्ये दिसत नसते. तुम्हाला जे करायचे असते ते करु शकला नाहीत तर असे होवू शकते.

भरपूर क्रिकेट आणि सतत क्रिकेट तुम्ही खेळत असाल तर दोन-चार डाव असे येणे स्वाभाविक आहे त्याबद्दल फार काही तुम्ही करायला गेलात तर उलट अशा अपयशी डावांचा डोंगर लागेल असे तो म्हाणतो.

भारताच्या पराभवाबद्दल तो म्हणतो की, एखादा डाव खराब झाला की लोकांची बोलायची भाषा बदललेली असते. पण मी तसा विचार करत नाही. आम्ही तसा विचार करु लागलो तर कदाचित आम्ही मैदानाबाहेर बसलेलो असू. प्रत्येक वेळी मैदानात उतरल्यावर प्रामाणिक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. मुलभूत गोष्टी व्यवस्थित करायला हव्यात आणि मेहनत उपयोगात आणायला हवी. तुम्ही ठरवल्यासारखे घडत नसेल तर तुम्ही स्वतःला दोष देणे योग्य नाही. पुढच्या कसोटीत ख्राईस्टचर्चला चांगले योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहिल. संघ जिंकला तर माझ्या 40 धावासुध्दा चांगल्या ठरतील. आणि संघ हरला तर शंभराच्यावर धावासुध्दा निरर्थक आहेत. याच मनस्थितीसह मी पुढच्या सामन्यात खेळणार आहे असे भारतीय कर्णधाराने म्हटले आहे.


Web Title : Kohli satisfied with his batting

Maharashtra Today : Online Marathi News Portal