डीफ कम्युनिटीसाठी रणवीर सिंगने उचलले असे पाऊल, जाणून आपणही कराल सलाम

ranveer singh

रणवीरने भारतीय सांकेतिक भाषा (Indian Science Language) ला भारताची २३ वी अधिकृत भाषा करण्याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हे कार्य केले…

सुपरस्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) सरकारी अधिकाऱ्यांना सातत्याने आवाहन करीत आहेत की त्यांनी भारतीय सांकेतिक भाषा (ISL) ला भारताची २३ वी अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी. आंतरराष्ट्रीय भाषेच्या आठवड्यासह दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त रणवीरने भारतीय संकेत भाषाला भारताची २३ वी अधिकृत भाषा बनवण्याविषयी जनजागृती केली. ‘इन्कइंक’ (IncInk) या स्वतंत्र रेकॉर्ड लेबलद्वारे अनेक उपक्रम सुरू करण्याची योजना तयार केली.

रणवीरने नेहमीच सामाजिक विषयांवर आवाज उठविला आहे आणि भारतीय संकेत भाषाला अधिकृत भाषा बनवण्याच्या मुद्यावर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नुकतीच त्याने एका याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. २३ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या ‘इंटरनेशनल वीक ऑफ डीफ’ दरम्यान अधिकाधिक लोकांना या विषयाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहे. या विषयावर त्याने समाजात बदल घडवून आणण्याची जबाबदारी घेतली आहे.

‘रणवीरने या आठवड्यात इन्कइंक (IncInk) ची दोन गाणी सांकेतिक भाषेत रिलीज करण्याची योजना आखली आहे. या आठवड्यात लाँच होणार्‍या काही वेगळ्या पुढाकारांद्वारे त्याला डीफ समुदायाच्या मनातील भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधू इच्छित आहे. या माध्यमातून तो देशातील जनतेला या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी पुढे येण्याची विनंती करेल आणि भारतीय संकेत भाषाला देशाची अधिकृत भाषा बनवण्यासाठी याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती करेल. रणवीर या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासही युवकांना उद्युक्त करेल, ज्यामुळे डीफ समुदायातील १० दशलक्षाहून अधिक लोकांना फायदा होईल.

भारतीय संकेतभाषाला अधिकृत भाषा बनवण्याच्या रणवीरच्या प्रयत्नांकडे पाहता, गेल्या आठवड्यात डीफ कम्युनिटीच्या लोकांकडून रणवीरचे आभार व्यक्त करण्यासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे आणि त्याचे मनापासून कौतुक केले आहे. जास्तीत जास्त लोकांना या विषयाची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या स्टारडमचा फायदा उठविणे हाच रणवीरचा उद्देश आहे, जेणेकरुन भारत प्रगतीशील पाऊल उचलू शकेल आणि ह्या भाषेला ओळख मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER