गुडघेदुखी – वेळीच उपाययोजना महत्त्वाची !

Knee Pain

गुडघेदुखीचा (Knee Pain) त्रास सुरु झाला की ‘सहसा वय झालं आता’ हे वाक्य नक्कीच ऐकायला मिळतं. तरुणावस्था संपून वृद्धावस्था सुरु झाली की गुडघ्यातून आवाज येणे, उठता बसतांना त्रास होणे, कुणाला सूजसुद्धा येत असते. वयोमानाप्रमाणे थोडासा त्रास होणे व हळूहळू तो वाढत जाऊन चालण्यास त्रास, काठीच्या आधार घ्यावा लागणे, मांडी घालून जमिनीवर बसता न येणे हे बघायला मिळते. हाडांची झीज झाली की असे त्रास सुरु होतात. कुणाकुणाला हा त्रास इतका वाढतो की शस्त्रकर्म करावे लागते. मामुली वाटणारी ही गुडघेदुखी अगदी परावलंबत्व आणू शकते. आघात, आमवात, संधिवात, पाण्डु, वातविकार, अस्थिविकारांमुळे गुडघेदुखी असू शकते.

वंगण जसे गाडी करीता आवश्यक तसेच या सर्व सांध्यांच्या चलनवलनाकरीता देखील आवश्यक आहे. त्यामुळे सांधेदुखी रोखण्याकरीता अभ्यंग हा उत्तम उपाय आहे. आहारातदेखील योग्य प्रमाणात तेल तुपाचा वापर शरीरातील स्निग्धता टिकवून ठेवतो. हाडं, संधि पेशी स्नायू त्यामुळे मजबूत राहतात. गुडघेदुखी करीता महानारायण तेल लावणे उपशय देणारे आहे.

थंड पदार्थ, अतिश्रम, रात्री जागरण, आंबट खारट आंबवलेले पदार्थ बेकरी पदार्थ, फरसाण पापड कोरडे रुक्ष पदार्थ हे वात वाढविणारे घटक आहेत त्यामुळे त्याचा नक्कीच त्याग करावा.

ताजे गरम अन्न, औषधसिद्ध जल, पोट साफ होत नसल्यास एरंडतेल सेवन वाढलेल्या वाताला कमी करतो.

आयुर्वेदात (Ayurveda) अभ्यंग जानुबस्ती, लेप, स्वेदन, बस्तिपंचकर्म गुग्गुळ कल्प व दशमूळ, अश्वगंधा इ. औषधी जानु शूलावर लाभदायक ठरतात. आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER