केएल राहुलने ICC टी -२० क्रमवारीत केला धमाल, विराट कोहलीलाही झाला याचा फायदा

Virat Kohli - KL Rahul

ICC च्या ताज्या जाहीर झालेल्या टी-२० रँकिंगमध्ये (T20 Rankings) केएल राहुल (KL Rahul) तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे तर विराट कोहली (Virat Kohli) एका जागेचा फायदा घेत आठव्या स्थानावर आहे.

टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने ICC च्या ताज्या टी -२० क्रमवारीत अव्वल-३ मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही एका जागेचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबर नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेनंतर हा बदल झाला आहे.

पहिल्या टी -२० सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावले होते. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचला तिसर्‍या स्थानावरुन हटवून हे स्थान मिळवले आहे. राहुलचे सध्या ८१६ गुण आहेत. शेवटच्या टी -२० सामन्यात ८५ धावा करणारा कोहलीने एक स्थान मिळवले आहे. तो आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि त्याच्याकडे ६९७ गुण आहेत. तसेच इंग्लंडच्या डेव्हिड मालनने फलंदाजांच्या ICC टी -२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या रशीद खानने क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. दुसर्‍या क्रमांकावर त्याचा संघाचा सहकारी मुजीब उर रहमान आहे. इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद एका स्थानाने वर आला असून तिसर्‍या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही फलंदाज पहिल्या दहामध्ये नाही.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी प्रथम स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ बांगलादेशचा साकिब अल हसन आणि ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER