सलामीला सर्वांत यशस्वी केकेआरचा संघ

KKR-IPL

१३ व्या आयपीएलचा (IPL) पहिला सामना आज चार वेळचे विजेते मुंबई इंडियन्स (MI) आणि तीन वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान होत आहे. या दोन संघांतील आयपीएलच्या २८ सामन्यांपैकी १७ सामने मुंबई इंडियन्सने तर ११ सामने चेन्नई सुपर किंग्जने जिंकले आहेत.

आयपीएलच्या सलामी सामन्यातही तीन वेळा हे संघ समोरासमोर आले आहेत आणि त्यात दोन वेळा मुंबईने बाजी मारली आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या १२ पैकी सहा सलामी सामन्यांत  कोलकाता नाईट रायडर्सचा  (KKR)  संघ खेळला आहे आणि त्यापैकी पाच सामने त्यांनी जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सचा (MI) संघसुद्धा सहा सलामी सामने खेळला आहे; पण त्यांना त्यापैकी दोनच जिंकता आले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाच सलामी सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोनच संघ असे आहेत ज्यांनी आतापर्यंत आयपीएलचा सलामी सामना खेळलेला नाही.

आयपीएलचे सलामी सामने

वर्ष —— विजयी ————– पराभूत

2008 — केकेआर ———– आरसीबी
2009 — एमआय ———— सीएसके
2010 — केकेआर ———— डेक्कन चार्जर
2011 — सीएसके ———— केकेआर
2012 — एमआय ————- सीएसके
2013 — केकेआर ————- डीडी
2014 — केकेआर ————- एमआय
2015 — केकेआर ————- एमआय
2016 — आरपीएस ———– एमआय
2017 — एसआरएच ———- आरसीबी
2018 — सीएसके ————- एमआय
2019 — सीएसके ————- आरसीबी

ही बातमी पण वाचा : आयपीएलमध्ये दरवेळी कुणी काढली पहिली धाव व कितव्या चेंडूवर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER