KKRला मिळाला IPLचा पहिला विजय, शुभमन गिलच्या शानदार खेळाने SRHचा 7 गडी राखून केला पराभव

KKR

शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला ७ गडी राखून पराभूत केले. केकेआरचा हा हंगामातील पहिला विजय आहे. त्याचबरोबर हैदराबादला सलग दुसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला.

शनिवारी शेख जाएद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २० षटकांत ४ गडी गमावून १४२ धावा केल्या. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिलच्या झगमगत्या फलंदाजीच्या जोरावर ७ गडी राखून विजय मिळविला. केकेआरचा हा हंगामातील पहिला विजय आहे. त्याचबरोबर हैदराबादला सलग दुसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला.

केकेआरच्या ३ बळी बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि इयन मॉर्गन यांनी डाव ताब्यात घेतला आणि संघाला जिंकण्यासाठी ९२ धावांची भर घातली. शुभमन गिलने नाबाद ७० आणि मॉर्गनने नाबाद ४२ धावा केल्या.

हैदराबादचा डाव
नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु केकेआरच्या धोकादायक गोलंदाजीपुढे हैदराबादचे फलंदाज १७ षटकापर्यंत ७ चा रन रेट गाठू शकले नाहीत. हेच कारण आहे की केकेआरने हैदराबादला १४२ धावांवर रोखले. हैदराबादकडून मनीष पांडेने ३८ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रिद्धिमान साहाने ३१ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या.

कोलकाताची घट्ट गोलंदाजी
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने या सामन्यात ७ गोलंदाजांचा प्रयत्न केला आणि सर्व गोलंदाजांनी शानदार गोलदांजी केली. कोलकाताकडून आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती यांनी १-१ गडी बाद केले. एक गडी धावबाद झाला.

केकेआरने सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली आणि हैदराबादच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांनी चांगली गोलंदाजी केली.

पॅट कमिन्सने ४ षटकांत केवळ १९ धावा देऊन एक बळी मिळविला. चक्रवर्तीने ४ षटकांत २५ धावा देऊन १ बळी घेतला. याखेरीज रसेलने १ विकेट घेतला. सुनील नरेन आज केकेआरसाठी काही खास करू शकला नाही. त्याने ४ षटकांत ३१ धावा दिल्या.

तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

कोलकात्याचा डाव
१४३ धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली आणि सुनिल नरेन खात न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला वॉर्नरच्या हाती खलील अहमदने झेलबाद केले. यानंतर नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी एकत्र काही मोठे शॉट्स लावले. पण त्यानंतर धोकादायक बनलेल्या नितीश राणाला नटराजनने त्याचा बळी घेतला.

राणाने १३ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याच्या बाद झाल्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक फलंदाजीस आला आणि खाते न उघडता राशिद खानचा बळी झाला.

यानंतर मॉर्गन आणि गिल यांनी एकत्रितपणे कोलकाताचा डाव पुढे केला. गिलने अचूक डाव खेळताना अर्धशतक पूर्ण केले. तसेच मॉर्गनबरोबर ५० चेंडूत अर्धशतकांची भागीदारीही पूर्ण केली. यानंतरही ही जोडी थांबली नाही आणि ९२ धावांची भागीदारी करत संघाने ७ विकेट्सने विजय मिळविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER