केकेआरने बदलले गोलंदाजीचे डावपेच; फिरकीपासून केली डावाची सुरुवात

KKR - Maharastra Today
KKR - Maharastra Today

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात क्वचितच नवा चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हाती सोपवला जातो. गोलंदाजीची सुरुवात क्वचितच फिरकी गोलंदाजांकडून केली जाते. किमान ९५ टक्के वेळा तरी सामन्यात गोलंदाजीची सुरुवात जलद गोलंदाजच करतात. अपवाद आहेतच. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने दीपक पटेलकडून केलेली सुरुवात हे उत्तम आणि आठवणीतले उदाहरण आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत तर इम्रान ताहीरने सर्वांत पहिले षटक टाकले होते.

हे आठवण्याचे कारण म्हणजे मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबईविरुद्ध (MI) डावाची सुरुवात फिरकी गोलंदाजीनेच केली आणि थोडथोडकी नाही तर पहिली सलग पाच षटकं फिरकी गोलंदाजांकडूनच टाकून घेतली. हरभजनसिंगने (Hatbhajan) दोन, वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravorthy) दोन आणि शकिब अल हसनने (Shakib Al Hasan) एक षटक टाकले. या प्रकारे पॉवर प्लेच्या सहामधील पाच षटकं फिरकी गोलंदाजांनी टाकली आणि हा डाव काहीसा यशस्वीसुद्धा झाला. क्विंटन डी कॉकला बाद करण्यासह मुंबईला ३७ धावांत मर्यादित ठेवण्यात त्यांनी यश मिळवले.

आयपीएलमध्ये केवळ चौथ्यांदाच असे घडले की, डावात पहिले तीन गोलंदाज जे होते ते फिरकी गोलंदाज होते. आणि यापैकी तीन वेळा हे गोलंदाज वापरणारा संघ केकेआरच होता. शिवाय आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदाच पहिली सलग पाच षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. असा प्रयोग पहिल्यांदा करणारा संघसुद्धा केकेआरचाच होता. २०१४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात रांची येथे त्यांनी शकिब अल हसन व सुनील नारायणकडून पहिली पाच षटके गोलंदाजी करून घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button