केकेआरने कर्णधार बदलला, राजस्थान रॉयल्सही त्याच मार्गावर

Cricket

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि संघाला अधिक योगदान देण्याच्या विचारातून कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) कर्णधारपद (Captain) सोडण्याची घोषणा केली आहे. त्याच्या जागी केकेआरचे नेतृत्व आता ओईन मॉर्गनकडे (Eoin Morgan) सोपविण्यात आले आहे. केकेआरचा संघ दोनवेळचा आयपीएल(IPL 2020) विजेता असून त्यांनीसद्धा याची पुष्टी केली आहे.

यंदाच्या मोसमात कार्तिकची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने सात सामन्यात एका अर्धशतकासह फक्त १०८ धावा केल्या आहेत.

2018 पासून नाईट रायडर्सचे नेतृत्व कार्तिककडे सोपविण्यात आले होते. गौतम गंभीर दिल्लीकडे गेल्यानंतर कार्तिककडे सुत्रे आली होती. त्यानंतर 2018 मध्ये केकेआर नॉकआऊटमध्ये पोहोचले होते आणि गेल्या वर्षी पाचव्या स्थानी राहिले होते.

मॉर्गन हा विश्वचषक विजेता कर्णधार आहे. तो २०११ पासून इंग्लंडच्या वन डे संघाचे नेतृत्व करतोय आणि त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने 126 वन डे पैकी 77 जिंकले आहेत तर 52 पैकी 30 टी-20 सामने जिंकले आहेत.

केकेआरचे मुख्याधिकारी वेंकी र्म्हैसूर यांनी कार्तिकचे आभार मानले आहेत. व्यवस्थापनाला कार्तिकच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले पण त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतोे. संघाला सर्वात पुढे ठेवणारे त्याच्यासारखे खेळाडू आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. असा निर्णय घ्यायला खूप हिंमत लागते असे असे त्यांनी म्हटले आहे.

मॉर्गन नेतृत्वाची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याबद्दलही त्यांनी केकेआरला भाग्यवान म्हटले आहे. या दोघांनीही एकत्रितरित्या चांगली कामगिरी केली आहे आणि आता फक्त कर्णधार- उपकर्णधार अशी त्यांच्या भूमिकांची अदलाबदल झाली आहे. ते सहजपणे होइल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

स्टिव्ह स्मिथच्या जागी बटलर???

केकेआरच्या नेतृत्वात हा बदल होत असताना योगायोगाने नेमका याच वेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आॅस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) व इंग्लंडचा जोस बटलर(Jos Buttler) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात बटलरने आजच्या घडीला सर्वोत्तम कर्णधार कोण? असा सवाल स्टिव्ह स्मिथला केला आणि स्मिथने विचार करुन उत्तर देताना ओईन मॉर्गनचेच नाव घेतले आहे. वन डे क्रिकेटसाठी तरी मॉर्गनच बेस्ट वाटतो असे स्मिथने म्हटले आहे.

दुसरीकडे याच स्टिव्ह स्मिथचा फॉर्म हरवला असल्याने त्यानेसुध्दा कर्णधारपद सोडावे अशी चर्चा सुरु झाली आहे. स्मिथने सुरूवातीला दोन अर्धशतकी खेळी केल्यावर नंतर तो एकदाच दोन आकडी धावा करु शकला आहे.

आॅस्ट्रेलियन संघात इंग्लंडचे कोणते दोन खेळाडू असायला हवेत या प्रश्नाच्या उत्तरात स्मिथने पटकन बेन स्टोक्स व जोस बटलर ही दोन नावे सांगितली.

दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदीसद्धा बदल होण्याची शक्यता आहे. स्मिथच्या जागी बटलरकडे नेतृत्व येइल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजस्थान रॉयल्सने केलेल्या ताज्या टष्ट्वीटने या चर्चेला अधिक हवा दिली आहे. त्या पोस्टमध्ये असलेल्या फोटोत बटलरच्या हातात चहाचा कप असून ‘बॉससारख्या जोससाठी धन्यवाद‘ असे म्हटलेले आहे.

गेल्या वर्षीसद्धा राजस्थान रॉयल्सने स्पर्धेदरम्यानच कर्णधार बदलला होता. अजिंक्य रहाणेच्या जागी स्टिव्ह स्मिथकडे सुत्रे सोपवली होती. मात्र राजस्थानचा संघ सातव्या स्थानी राहिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER