के.के.रेंजप्रश्नी शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार!

Raj Thackeray

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील के. के. रेंजमुळे (k.k.range) राहुरी, पारनेर व नगर ग्रामीण तालुक्यातील २३ गावांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात या गावांतील प्रमुख ग्रामस्थ व शेतकरी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत.

तत्पूर्वी शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष अनिल चितळे (Anil Chitade) यांची नुकतीच भेट घेतली. चितळे यांच्या भेटीमध्ये विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या. पोटच्या आईप्रमाणे जमिनींचा सांभाळ केला. त्या जमिनीपासून क्षणात दूर होणं  हा विचारदेखील आम्ही करू शकत नाही.

रक्ताचं पाणी करत खडक फोडून जमिनी सुपीक बनविल्या आणि आज सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली आमच्याकडून जमिनी घेतल्या जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. अशा सैनिकी प्रशिक्षणामुळे धरणाला धोका निर्माण होऊ शकतो, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER