औरंगाबाद : मकरसंक्रांतीनिमित्त युवा सेनेतर्फे पतंग महोत्सवाचे आयोजन

Kite Festival organized by Yuva Sena for Makar Sankranti

औरंगाबाद : मकरसंक्रांतीनिमित्त युवा सेनेकडून मयूर पार्कच्या पाठीमागे रामचंद्र नगर येथे सुरे यांच्या शेतात बुधवारी (१५ जानेवारी) सकाळी १० वाजता पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि युवतींच्या मनातून असुरक्षिततेची भावना दूर व्हावी, यासाठी व आकाशात ज्याप्रमाणे पतंग उंच भरारी घेतो त्याप्रमाणे त्यांनी देखील त्यांचा आत्मविश्वास बळकट करावा या हेतूने या पतंग महोत्सवासाठी महिलांना व युवतींना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक नारायण सुर्वे यांनी दिली.

यावेळी युवा सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अमोल गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, युवासेना जिल्हाधिकारी ऋषिकेश खैरे, नगरसेवक सचिन खैरे, बन्सी जाधव, सीमा खरात, स्वाती किशोर नागरे, युवासेना महाविद्यालय कक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल, युवती सेना जिल्हाप्रमुख डॉ. अश्विनी जैस्वाल, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.