‘टेंडर कोणाला मिळाले’ विचारणाऱ्याच्या बापाचा किशोरी पेंडणेकरांनी केला उध्दार म्हणाल्या …

Kishori Pednekar

मुंबई : ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्याचा बाप काढणे किशोरी पेडणेकर(Kishori Pendnekar) यांना महाग पडले. सोशल मीडियावर(Social Media) त्या ट्रोल होत आहेत. त्यांनी ते वादग्रस्त ट्विट डिलीट केले आहे.

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत आपल्या ट्विटरला शेअर केली. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेले ग्लोबल टेंडर आणि त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

या ट्विटवर एकाने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी ‘तुझ्या बापाला’ असे म्हटले ! .

हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी हे ट्विट डिलीट केलं.

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असे भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीदेखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button