लोकांचा जीव महत्त्वाचा, टीका करण्याऐवजी मदत करा; महापौरांचा केंद्र सरकारला टोला

मुंबई : महाराष्ट्रासह देशात रुग्णांची (carona patients) संख्या वाढतच चालली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना (Corona virus) स्थिती गंभीर आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खाजगी रुग्णालयातही खाटांची कमतरता आहे. डॉक्टर्स युद्धपातळीवर काम करत आहेत. विषाणूचे वाढते रुग्ण पाहता लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. पण अचानकपाने लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहे.

एकीकडे कोरोना स्थिती बिकट बनत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण होत आहे. या वादात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. पेडणेकर म्हणाल्या की, “ज्या लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस दिला आहे, अशा नागरिकांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. अशा परिस्थित लशीचा तुटवडा पडल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.”

“कोरोना प्रतिबंधक लशीच्या बाबतीत राज्याचा केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झाला आहे. पण केंद्राची यंत्रणा सकारात्मक नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचा हकनाक जीव जात आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस मिळाला नाही, तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत. लोकांची काळजी लक्षात घेऊन सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. आज १ लाख ७६ हजार लशी येणार आहेत. पण त्या लशीही अपुऱ्या पडणार आहेत. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याच मोठी आहे.” असेही महापौर म्हणाल्या. “लसीकरणाबाबत कोणतेही राजकारण करू नये. लोकांचा जीव वाचवायचा आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यांना लसीचे वाटप करण्यात यावे.” अशी मागणी महापौर पेडणेकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button