मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधीही केला नव्हता : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने (mumbai-rains) हजेरी लावली आहे . येथील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे . यावरून विरोधकांनी मुंबई महापालिकेला (BMC) धारेवर धरले . यावर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली .मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा आम्ही केला नव्हता. पण चार तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगले झाले नाही हे मान्य करावं लागेल, असे महापौर यांनी सांगितले .

आज एकाच वेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबले . हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला. पण ही कारणं आम्ही देणार नाही, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपून काढलंय. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. दहिसर मिलन सब वे, हिंदमाता कायम पाण्याखाली जातं, पण आता पाणी साचलेले नाही. पाण्याचा निचरा झाला आहे.

पाणी भरणार नाही असा दावा आम्ही कधीच केला नाही. चार तासांत पाण्याचा निचरा होतो, असे पेडणेकर यांनी नमूद केले . मुंबईला अतिवृष्टीचा अधिक फटका बसू नये म्हणून महापालिकेने तयारी केली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागांत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button