
मुंबई : ‘फ्युचर ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किशोर बियाणी व त्यांच्या ग्रुपला ‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (SEBI) ‘इन्सायडर ट्रेडिंग’बद्दल (Insider Trading) दोषी ठरवून २० कोटी रुपयांचा दंड केला आहे. एखाद्या कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी फक्त त्यांनाच माहित असलेल्या कंपनीसंबंधीच्या माहितीचा उपयोग करून त्या कंपनीच्या शेअर्सची बाजारात खरोदी-विक्री करून अवाजवी लाभ करून घेतात तेव्हा त्यांनी बाजारात ‘इन्सायडर ट्रेडिंग’ केले असे म्हटले जाते.
स्वत: किशोर बियाणी व त्यांच्या फ्युटर रिटेल या कंपनीसह तिघांना व्याजासह २० कोटी रुपयांचा दंड करण्याखेरीज फ्युचर रिटेल या कंपनीचे शेअर्स आणि रोख्यांची पुढील दोन वर्षे बाजारात कोणत्याही प्रकारे खरेदी-विक्री करण्यासही बंदी करण्यात आली आहे. या तिघांनी ‘इन्सायडर ट्रेडिंग’ करून जो अवाजवी लाभ मिळविला तो निरस्त करण्यासाठी म्हणून हा दंड आकारण्यात आला.
फ्युचर ग्रुपमधील फ्युचर रिटेल आणि व्ल्यूरॉक ईसर्व्हिसेस लि. व प्रॅक्सिस होम रिटेल या कंपन्यांच्या ‘डिमर्जर’पूर्वी सन २०१७ मध्ये या तिघांनी फ्युचर रिटेल कंपनींच्या शेअर्सच्या बाबतीत ‘इन्सायडर ट्रेडिंग’ केले, असा निष्कर्ष ‘सेबी’ने चौकशीअंती काढला.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला