अनवाणी पायानं हॉकी जिंकत ब्रिटीश गुलामीचा बदला घेणारे ‘किशनलाल’

वर्ष १९४८ स्वतंत्र भारताची हॉकी टीम ऑलम्पिकसाठी इंग्लंडला गेली होती. या पहिल्या ऑलम्पिकसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमकडे संपूर्ण जगाचं लक्ष होत कारण ही टीम आनवाणी पायानं जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठीत स्पर्धेत उतरली होती. आणि या टीमच्या कॅप्टन टीमला गोल्ड मिळवूनही दिलं होतं. त्यांच नाव किशन लाल. दोन वर्षापूर्वी अक्षय कुमारनं (Akshay Kumar)गोल्ड या चित्रपटात किशनलाल (Kishanlal ) यांची भूमिका निभावली होती.

लहानपणापासून हॉकी होती ओढ

किशन लाल यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१७ला मध्यप्रदेशच्या माउमध्ये झाला. लहानपणापासून त्यांना खेळात विशेष आवड होती. इंग्लंडच्या राजासोबत बसून जेवण करावं हे त्यांच स्वप्न होतं. नंतर त्यांनी जिद्दीच्या जोरावर हे स्वप्न पूर्ण ही केलं.

त्यांना पोलो खेळात विशेष आवड होती. या खेळातले ते तरबेज खेळाडू होते. याच खेळामुळं ते नंतरच्या काळात हॉकीकडं वळले. १४व्या वर्षापासून त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी स्वतःच्या कौशल्यांकडं लक्ष दिलं आणि हॉकीच्या खेळाडूंमध्ये त्यांच नाव चर्चेचं विषय बनलं.

याच जोरावर त्यांना क्लबमध्ये संधी मिळाली. कठिण परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर माउ हिरोज क्लबकडून खेळण्याची संधी त्यांनी मिळवली. दोन वर्षाच्या आतच त्यांच्याकडे या टीमच नेतृत्त्व आलं. १९३७ला भगवंत कल्ब हॉकीचचे कॅप्टन एम एन जुत्शींनी त्यांची प्रतिभा नाही ओळखली. या काळात एक उत्कृष्ठ हॉकीपटू म्हणून ते नावारुपाला आले.

१९४१ला त्यांना पश्चिम रेल्वेकडून हॉकी खेळण्याची संधी मिळाली. किशन यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळालं होतं. १९४७पर्यंत त्यांच नाव देशभरातल्या मोठ्या खेळाडूंच्या यादीत सामील झालं होतं. त्यांची नजर आता जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धेकडं, ऑलम्पिककडं होती.

दुसऱ्या महायुद्धामुळं ऑलम्पिकच्या स्पर्धा रदद् झाल्या होत्या. तोपर्यंत १९४७ उजाडलं भारत विभाजीत होवून स्वतंत्र झाला आणि १९४८च्या ऑलम्पिक स्पर्धेची घोषणा झाली.

दिग्गज खेळाडू पाकिस्तानात गेले युवकांना मिळाली संधी

या आधी भारतीय संघानं १९२८, १९३२, १९३६ अशा तीन ऑलम्पिक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. पण सारेच मेडेल ब्रिटीशांची सत्ता असताना मिळवले होते. १९४८च्या ऑलम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून द्यायचा निश्चय किशनलाल यांनी केला होता.

भारतीय हॉकी टीमच्या कॅप्टनपदी झाली निवड

स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी झालीच पण हॉकी टीमसुद्धा दोन देशात वाटली गेली. आता आव्हान होतं नवी टीम उभारण्याच. अनेक दिग्गज भारतीय खेळाडू आता पाकिस्तानी टीमचा हिस्सा होते. भारतीय हॉकी टीमचा आत्मा मानले जाणारे ध्यानचंद रिटायर झाले होते. भारत आणि पाकिस्तानची संयुक्त टीम या ऑलम्पिकला पाठवली जावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता पण दोन्ही देशांनी तो प्रस्ताव फेटाळला.

टीममध्ये मोठ्याप्रमाणात युवकांना संधी देण्यात आली. किशनलाल यांनी स्वतः सहभाग घेत टीम निवडली. किशनलाल यांच्या नेतृत्त्वात ऑलम्पिक खेळण्यासाठी पूर्ण जोशात भारतीय टीम लंडनला रवाना झाली.

ब्रिटीशांचा केला पराभव

भारतीय टीम पहिल्यांदा त्यांच्या राष्ट्रीय खेळाला आपल्या झेंड्याखाली खेळणार होती. किशनलाल आणि टीमसाठी हा अभिमानाची क्षण होता. त्यांच्याजवळ संधी होती गौरवशाली इतिहास घडवायची.

लंडन ऑलम्पिकमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८-० ने पराभव केला. पहिल्या विजयामुळं टीमचा आत्मविश्वास बळावला. अर्जेन्टीना सोबत झालेल्या दुसऱ्या सामन्यात ९-१नं भारतीय टीम जिंकली. सेमी फयानलला हॉलंडचा २-१नं पराभव करत भारतीय टीम फायनलमध्ये पोहचली तर पाकिस्तानी टीमचा ब्रिटननं पराभव केला. आणि ब्रिटीशांशी बदला घेण्याची संधी पाकिस्ताननं गमावली.

किशनलाल यांचा ‘तो’ निर्णय

ब्रिटशांविरोधात फायनल खेळायला टीम मैदानात उतरली. स्टेडीअममधील प्रेक्षकांना भारतीय टीमनं अभिवादन केलं सामना सुरु झाला. पुढं अचानक पाऊस सुरु झाला नंतर खेळाला सुरुवात झाली. पण पावसामुळं भारतीय खेळाडूंचे पाय घसरत होते. त्यांना तोल सांभाळनंही कठीण जात होतं. अशावेळी किशनलाल यांनी निर्णय घेतला आनवाणी पायानं खेळण्याचा.

त्यांनी टीमला सुचना दिली. अक्खी टीम बीना बुटाची मैदानात खेळत होती. हे पाहून स्टेडीअम भारावून गेलं होतं. इतिहासात पहिल्यांदा कोणती टीम अनवाणी पायाने खेळत होती. टीम इंडीया जबरदस्त खेळली. त्यांनी ब्रिटनच्या टीमचा ४-०नं त्यांच्याच राहत्या घरी पराभव केला.

अशाप्रकारे किशनलाल यांनी वर्षानूवर्षाच्या गुलामीचा इंग्रजांकडून बदला घेतला. आणि इंग्लंडच्या प्रिन्ससोबत रात्रीच जेवणही केलं. किशनलाल यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना १९६६ला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. २२ जून १९८०ला त्यांनी चैन्नईत अखेरचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER