‘किसान रेल्वे’ने द्राक्ष निर्यात करून केली ४५ लाखांची कमाई

Grapes

नाशिक :- कोरोनाच्या (Corona) काळात जगाची अर्थव्यवस्था अस्तव्यस्त झाली असताना निफाड तालुक्यातील व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी या भागातील शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यात करून सुमारे ४५ लाख रुपये त्यांना मिळवून दिलेत.

पानगव्हाणे यांनी ‘विशेष किसान रेल्वे’चा फायदा घेऊन दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्टेशन असलेल्या येवला तालुक्यातील नागरसुल रेल्वे स्थानकातून सुमारे दीडशे टन द्राक्ष बांग्लादेशात (Bangladesh) निर्यात कली. किसान रेल्वे थेट बांग्लादेशच्या सीमेपर्यंत जाते त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांना व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या निफाड, लासलगाव स्थानकातून विशेष किसान रेल उपलब्ध न झाल्याने नागरसुल येथून द्राक्षांची निर्यात करण्यात येते आहे.

लासलगावला किसान रेल्वे उपलब्ध झाल्यास होणार शेतकऱ्यांना फायदा

लासलगाव येथे विशेष किसान ट्रेन उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे एका ट्रक मागे पंधरा ते वीस हजार रुपये वाचणार आहेत. ट्रकने द्राक्ष बांग्लादेशात पाठवण्यास अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च लागतो. मात्र, रेल्वेने पाठवल्यास दीड लाख रुपये लागतात. रेल्वेने बांग्लादेश बॉर्डर पर्यंत पोहोचण्यासाठी तीस तास लागतात तर ट्रकने पन्नास तासाहून जास्त वेळ लागतो. थेट बांग्लादेशातील ढाकापर्यंत विशेष किसान रेल गेल्यास अवघ्या ३६ तासात द्राक्ष बांगलादेशात पोहोचणार आहेत. लासलगाव, निफाड रेल्वे स्थानकातून एसी विशेष किसान रेल्वे मिळावी तसेच बांगलादेशातील ढाका पर्यंत रेल्वे जाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे द्राक्ष निर्यातदार व्यापारी नामदेव पानगव्हाणे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : अयोध्या राममंदिरासाठी लंकेच्या अशोक वाटिकेतून शिळा दान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER