पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, उद्या बैठक

PM Narendra Modi - Farmers Protest

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं भाषण आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांनी पाठवलेल्या पत्रानंतर, पुढील रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने बैठकीचं आयोजन केलं आहे. आज दुपारी पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण केलं. यावेळी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. “काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या या आवाहनानंतर शेतकरी संघटना पुढील रणनीती ठरवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेची आज बैठक होऊ शकली नाही. केवळ पंजाबच्या संघटनांची बैठक झाली. राष्ट्रीय शेतकरी संघटना उद्या म्हणजे शनिवारी बैठक घेणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतीचा पुढील हप्ता जारी केला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत पाठवली जाते. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER