किरणोत्सव : अंबाबाई मूर्तीच्या खांद्यापर्यंत किरणे

अंबाबाई किरणोत्सव

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai idol) किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे (golden rays of the sun) देवीच्या खांद्यापर्यंत पोहचली. सायंकाळी ५.४८ मिनिटांनी मूर्तीच्या कमरेच्या वर खांद्या जवळ जावून लुप्त झाली. त्या नंतर कापूर आरती करण्यात आली.

रविवारपासून अंबाबाईचा किरणोत्सव सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी किरणे देवीच्या पायापर्यंत पोहोचली होती. उद्या गुरुवारी किरणोत्सवचा शेवट दिवस आहे. यंदाच्या वर्षी देवस्थान समितीने किरण मार्गातील अडथळे दूर केले होते. तसेच ढगाळ वातावरण नसल्याने यंदा किरणोत्सव पूर्ण होण्यास मदत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER