तक्रारीची दखल न घेतल्याने किरीट सोमय्या यांचे पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन

Kirit Somaiya

मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी  खासदार किरीट सोमय्या यांना १ जूनपासून घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत तक्रार करूनही मुंबई पोलीस (Mumbai Police) काहीही कारवाई करीत नाहीत, असा आरोप करत सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेत्यांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत तक्रार केली होती. ही तक्रार दापोलीतील परब यांच्या रिसॉर्टबाबत आहे. परब यांनी हा रिसॉर्ट अवैध पैशांतून बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ‘पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी (Ratnagiri) येथील दापोली येथे १० कोटींचा (काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल मंत्रालयाकडेही मी तक्रार केली आहे’ असे  सोमय्या यांनी म्हटले होते. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, महामंत्री संजय उपाध्याय, महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे इत्यादी नेते मंडळी उपस्थित होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button