आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का?; किरीट सोमय्या यांचा सवाल

मुंबई : राज्यात कोरोनचे संकट दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत . या आवाहनंतरही माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचे भान महाडिक यांनी राखले पाहिजे होते . या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेची आज भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार अशी मोहीम सुरू केलीय. त्याची घोषणाही त्यांनी केली. ते कोविड योद्धांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावर टीका करत असतील तर मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळ्याची चौकशी होणार आहे. पुण्यात रविवारी झालेल्या लग्न सोहळ्याला तुफान गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER