शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील – किरीट सोमय्या

Kirit Somaiya - Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रावर शिवसेनेचा (Shivsena) एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा आदेश देणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शेलक्या शब्दात खिल्ली उडविली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकेल. पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल, अशी मिस्कील टीका किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून किरीट सोमय्या ( kirit somaiya) यांच्या टीकेला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांनी कंगना राणावत आणि बिग बॉस कार्यक्रमावरून सुरू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. कंगना राणावत प्रकरणात मुंबई महानगरपालिकेने वकिलांच्या फीसाठी लाखो रुपये खर्च केले. हा अजब कारभार आहे. तर बिग बॉस कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. माझी पत्नी आणि सून मराठीच आहेत. अशा पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करणे चूक असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER