… हे सगळं शरद पवारांचे नाटक ; भाजप नेत्याची टीका

kirit-somaiya-slams-shard-pawar

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीकास्त्र सोडले. हे सगळं शरद पवार यांचं नाटक आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सोमय्या (Kirit Somaiya)म्हणाले .

गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी माहिती समोर आली होती.

धनजंय मुंडे यांचे तीन-तीन बायकांबरोबर संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याचा पोलिसांनी जरुर तपास करावा. मात्र, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवून ठेवली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी केलंच असेल म्हणूनच संबंधित महिला त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशी व्यक्ती मंत्रिपदावर राहूच शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

ही बातमी पण वाचा : आघाडीच्या नेत्यांवर आरोप होत असताना पवार आणि ठाकरे गप्प का? : किरीट सोमय्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER