वर्षा राऊतांकडून ‘ते’ ५५ लाख परत, तर किरीट सोमय्या म्हणतात ‘हिसाब तो देना पडेंगा’

ED Inquiry

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीकडून चौकशी (ED Inquiry) झाली होती. पीएमसी बँक (PMC Bank) घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्याकडून २०१०मध्ये ५५ लाख रुपयांचं कर्ज घेतल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. यासंदर्भात ४ जानेवारी रोजी ईडीची चौकशी झाल्यानंतर आता वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत केले आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली आहे.

शेवटी राऊत साहेबाना पैसे परत करावेच लागले. मात्र त्यांना हिशोब द्यावाच लागेल, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. दरम्यान, वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत केले असल्याने या प्रकरणावर ईडीकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईडी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ही बातमी पण वाचा : “मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी” – अतुल भातखळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER