बेनामी संपत्ती : उद्धव ठाकरे यांची ईडी लवकरच करणार चौकशी – किरीट सोमय्या

मुंबई :- बेनामी संपत्ती प्रकरणी लवकरच मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची ईडी चौकशी करेल, असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांच्या  बेनामी मालमत्तेचे पुरावे आहेत आणि मी ते लवकरच ईडीला (ED) देणार आहे, असे ते म्हणालेत.

रायगडमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या ९.३५ एकर जमिनीची माहिती उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराने सहा वर्षांपासून लपवून ठेवली आहे. २०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही या संपत्तीची माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, असे सोमय्या म्हणालेत.

मुख्यमंत्री ठाकरेंची लवकरच निवडणूक आयोगाद्वारे लवकरच चौकशी करण्यात येईल. याशिवाय नोव्हेंबरमध्ये रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावेही बेनामी मालमत्ता उघडकीस आली आहे, असाही दावा किरीट सोमय्या यांनी केला.

ते म्हणालेत की, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनाही याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा अहवाल आयकर विभाग आणि ईडीला देण्यासही सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री, शिवसेना आमदाराच्या नातेवाइकांडून कमी भावात जमिनीची खरेदी – किरीट सोमय्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER