
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांसह शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांच्या पत्नीने ३० पार्सल जमीन आणि १९ बंगले खरेदी केल्याचा आरोप भारतीय जनता (BJP) पक्षाचे नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केला आहे. एकूण १० कोटीरुपये किमतीची जमीन केवळ २.१ कोटीत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“एप्रिल २०१४ मध्ये जेव्हा या कराराची नोंद झाली तेव्हा त्या जागेचे बाजार मूल्य ४..१४ कोटी रुपये होते परंतु रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी ते केवळ २.१ कोटी रुपयात विकत घेतले. २०२०-२१ मध्ये त्यांनी बंगल्यांसाठी आणखी ५.२९ कोटी रुपये दिले. असा आरोपही त्यांनी केला. सोमय्या यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १९ बंगल्यांचा उल्लेख न केल्याचा मुद्दा राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला