‘नाईट लाईफ’ की ‘नाईट क्लब’? किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारला सवाल

Kirit Samaiya And Aaditya Thackeray

पनवेल : ठाकरे सरकार ‘नाईट लाईफ’ सुरू करून दारू आणि पब संस्कृतीला चालना देत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.हे ‘नाईट लाईफ’ आहे की ‘नाईट क्लब’ आहे? असा सवालही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर ‘बेमुदत शिर्डी बंद’ मागे; आता लक्ष उद्याच्या बैठकीकडे

महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यावर सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आज रविवारी पनवेल येथे माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, नाईट लाईफचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. उच्चभ्रू लोकांसाठी ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे.