अडसूळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, सोमय्यांची ईडी-आरबीआयकडे चौकशीची मागणी

Anandrao Adsul-Kirit Somaiya

मुंबई :- शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचं म्हटलं. तसेच, त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीआयएल या कंपनीकडून देणगी स्वीकारल्याचाही गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नंतर आता आनंदराव अडसूळ यांच्यावर गैरव्यवहार केले असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी स्व:त अडसूळ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ईडी आणि आरबीआयला केली आहे. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या परिवाराची भूमिका असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच एचडीआयएल या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून त्यांनी 1 कोटी रुपयांची देणगी स्वीकारल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी ईडी आणि आरबीआयला या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ही बातमी पण वाचा : वर्षा राऊतांकडून ‘ते’ ५५ लाख परत, तर किरीट सोमय्या म्हणतात ‘हिसाब तो देना पडेंगा’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER