ठाकरे परिवाराच्या मित्र बिल्डर्सला ७४ कोटी रोख द्या, मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव; किरीट सोमय्या यांचा आरोप

Kirit Somaiya-uddhav thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने ठाकरे सरकारने त्यांचे पारिवारिक मित्र, बिल्डर्स शहीद बालवा, विनोद गोयंका याना ७४ कोटी ७ लाख ५ हजार २५७ रुपये बक्षीस देण्याचा निर्धार केला आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

याबाबतच्या व्हायरल व्हिडिओत ते म्हणाले की, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरच्या प्रकल्पाला अंतर्गत/ इंटरनल रोडसाठी TDR मिळू शकतो. परंतु मित्र बिल्डरला रोख देण्याचा साठी आग्रह सरकारने धरला व बिल्डरला ७४ कोटी रुपये रोख द्यावे म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाकडून महापालिकेवर दबाव आणण्यात आला.

ही नवीन प्रथा अशीच सुरु राहिली तर २०२१ ह्या वर्षात मुंबई महापालिकेला वेगवेगळ्या बिल्डर्सला १ लाख कोटी रुपये रोख द्यावे लागती, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER