किरीट सोमय्या हात धुऊन शिवसेनेच्या मागे ; आता थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुराव्यासह निवडणुक आयोगाकडे केली तक्रार

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

मुंबई :- भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी विशेष प्रचलित आहेत. महाविकास आघाडी सरकारमधला (Mahavikas Aghadi) प्रत्येक लहान मोठा भ्रष्टाचार त्यांनी आतापर्यत पुराव्यासह उघडकीस आणलेला आहे. कोविडच्या (Covid-19) साथीतही सोमय्या यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरून ठाकरे सरकारची पोलखोल करताना दिसले आहेत. काही दिवसांपासून ते शेवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यातच आता थेट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधातच निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे 5 कोटीची संपत्ती आहे. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला घोटाळ्यांवरून घेरले आहे. मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने जप्त केलेली 78 एकर जमीन, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची भागिदारी असलेली महाकाली गुंफेची जमीन बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव, मुंबई महापालिकेने दहिसर येथील 2.55 कोटीचा भूखंड बिल्डरला 349 कोटीला दिला, पाच हजार बेडवाल्या 12 हजार कोटीच्या रुग्णालयाच्या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे सोमय्या यांनी ही तक्रार केली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून ही संपत्ती लपवल्याचा दावा केला आहे. तसेच आम्ही केलेली तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचं बलदेव सिंह यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या रडारवर आता किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER