राऊतांची जेलची भाषा म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे, राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवायचे आहे का?

Kirit Somaiya-Rahul Gandhi-CM Uddhav Thackeray-Sanjay Raut

नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

किरीट सोमय्या म्हणाले –

“संजय राऊतांचे आजचे विधान आहे की, सावरकरांना विरोध करणाऱ्या सर्वांना जेलमध्ये पाठवले पाहिजे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डसोबत घनिष्ठ संबंध होते. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे बोलत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? उद्धव ठाकरे, राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत.” असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांचा काँग्रेसवर ‘हल्लाबोल’; ‘त्यांना’ सावरकरांच्याच कोठडीत ठेवा!