शिवसेनेच्या रडारवर आता किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Uddhav Thackeray - Kirit Somaiya

मुंबई :- `राज्यात शिवसेनेने (Shiv Sena) भाजपशी (BJP) नाते तोडत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन केले. त्यानंतर भाजप नेते शिवसेनेवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या सततच्या आरोपांविरोधात शिवसनेने सोमय्या याना अद्दल घडवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेने सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी चाचापणी सुरु केली आहे. सोमय्या यांनी सातत्याने चालवलेल्या आरोपांच्या मालिकेमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात असल्यामुळे शिवसेना ही कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जातोय, असे शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे यापुढेही सोमय्या हे शांत होणार नाहीत असे गृहीत धरत शिवसेनेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने पावलंही उचलली आहेत. सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरु असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

मानहानीचा दावा केलेले खटले वर्षानुवर्षे चालतात. नंतर ते विस्मृतीस जातात. हा प्रकार टाळण्यासाठी सोमय्या यांच्या विरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालवाता येईल का याचाही शिवसेनेकडून विचार केला जात आहे. तशी विनंती न्यायालयाला करता येईल का?, याबाबतची माहिती शिवसेनेकडून घेतली जात आहे. याबाबत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकिलांचा सल्ला घेतला जात आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या नेत्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील.

ही बातमी पण वाचा : भंडारा दुर्घटना : आरोग्य व्यवस्थेवर पंडित नेहरुप्रमाणे काम करा; शिवसेनेचा केंद्राला सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER