मुंबई महापालिकेत रेमडेसिवीरपाठोपाठ कोरोना लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अशा वेळी लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहीम बंद पडत असल्याचे चित्र बघायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला केवळ तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात पाच टेंडर आले. हे पाच टेंडर खोटे असल्याचा दावा करत, मुंबई महापालिकेचा हा कोरोना लस घोटाळा असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरची मुदत काल संपली. त्यात सुरुवातीला फक्त तीन टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासांत पाच टेंडर आहे. हे पाच टेंडर खोटे आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर करण्यात आली नाही. तसंच कागदपत्र देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आठ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

त्याचबरोबर गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारनं रेमडेसिवीर घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. महापालिकेनं रेमडेसिवीरसाठी प्रत्येकी १ हजार ५६८ रुपयांची ऑर्डर काढली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हाफकीनने ६६८ रुपयांची ऑर्डर काढली. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता रेमडेसिवीरपाठोपाठ कोरोना लस घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button