दुसऱ्या दिवशी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव

Kiran Utsav Ambabai Temple Kolhapur

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील (Ambabai Temple) किरणोत्सवाच्या आज शनिवारी दुसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे देवीच्या चरणापर्यंत पोहचली. आज सुर्य किरणांनी ठिक ६.१५ मि. श्री देवीचे चरण स्पर्श केले व हळूहळू ६.१७ मि. पर्यंत श्री देवीच्या पायांवर सरकत सुर्य किरणे दक्षिणेकडे लुप्त झाली. त्यानंतर मंदिरातील घाट होऊन आरती करण्यात आली.

काल, शुक्रवारी अंबाबाईचा किरणोत्सव सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे देवीच्या गाभर्यापर्यंत पोहोचली नाही. आज ढगाळ वातावरण नसल्याने किरणोत्सव पूर्ण होण्यास मदत झाली.

किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचा अनोखा सोहळा आहे. सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. साधारण दिडशे मीटरहून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप, गणेश मंडप, मध्य मंडप, अंतराल मंडप, गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात. तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात. या सोनेरी किरणांच्या प्रकाशात जगदंबेचं दुर्गा सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात दिलेलं तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची हे वर्णन सार्थ ठरते . या किरणांचा स्पर्श होताच मोठा घंटानाद करून सहावी आरती केली जाते. गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर व अलौकिक उत्सव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER