‘लगान’च्या सेटवर झाली होती किरण राव आणि आमिरची पहिली भेट

Lagan

निर्माता-दिग्दर्शक किरण रावचा जन्म ७ नोव्हेंबर १९७३ रोजीचा. या वर्षी किरण  ४७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. किरण बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची पत्नी आहे. ‘लगान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या दोघांच्या प्रेमकथेबद्दल फारसे लोकांना माहिती नाही. किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण आणि आमिर खानच्या (Aamir Khan) प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ …

किरण राव (Kiran Rao) राजघराण्यातील असून तिचा जन्म तेलंगणात झाला. १९९२ मध्ये किरणचे आई-वडील मुंबईत शिफ्ट झाले आणि तीही तिच्या पालकांसह इथेच राहायला गेली. तिने सोफिया कॉलेज फॉर वुमनमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) संपादन केली. किरणला चित्रपटांमध्ये रस होता, म्हणूनच तिने या क्षेत्रात करिअर निवडले.

तिने आमिर खान स्टारर फिल्म ‘लगान’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून  पदार्पण केले. चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. लगान दरम्यान किरण राव आमिर खानला पहिल्यांदा भेटली. येथे आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही अस्थिर होते. आमिर खानने बालपणातील मित्र रीनाशी लग्न केले आणि त्यानंतर लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर किरण रावने आमिरच्या आयुष्यात प्रवेश केला.

किरण रावच्या भेटीबाबत एका मुलाखतीत आमिर खानने म्हटले होते की, लगान या चित्रपटाच्या वेळी किरण माझ्या टीमची सदस्य होती. त्यावेळी ती सहायक दिग्दर्शक होती. घटस्फोटानंतर मी किरणला भेटलो होतो. त्यावेळी ती माझी चांगली मैत्रीणसुद्धा नव्हती.  घटस्फोटानंतर मी मानसिक आघातातून जात होतो. त्या दरम्यान, एक दिवस किरणचा फोन आला.

तो पुढे म्हणाला, ‘मी किरणशी सुमारे अर्धा तास बोललो. मला तिच्याशी बोलून चांगलं वाटलं. त्या कॉलनंतर आम्ही एकमेकांना डेट करण्याचे ठरवले. मैत्री बरीच झाली त्यानंतर मला असं वाटायला लागलं की तिच्याशिवाय माझं आयुष्य नाही. मग काय होतं? आम्ही आमच्या नात्याला नवीन नाव दिलं आणि २००५ मध्ये आमचं लग्न झालं. आम्हास एक मुलगा आहे- आझाद.  आमिरला रीनापासून इरा आणि जुनैद ही दोन मुलेही आहेत.

ही बातमी पण वाचा : माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांची जोडी कधीही चित्रपटात का नाही…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER