आरंभ : तृतीयपंथी अंजली पाटील विजयी ; राज्यासाठी ऐतिहासिक आणि गौरवास्पद

Anjali Patil

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक चार मधून अंजली पाटील (Anjali Patil)  या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या आहेत. ही राज्यासाठी अत्यंत अभिमानाची, गौरवास्पद बाब आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील हिने उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा केल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती.

याबाबत अंजली पाटील हिने आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत हिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

गौरवाची बाब म्हणजे अंजली पाटील यांनी विजयाची पताका रोवल्याने हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे.

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER