किंग्ज इलेव्हनने केला शतकांचा विक्रम

Kings XI Punjab

किंग्ज इलेव्हनचा (Kings Xi punjab) कर्णधार के.एल.राहुलनंतर (KL Rahul) रविवारी सलामीवीर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) हासुध्दा आयपीएल 2020 मधील शतकवीर ठरला.अवघ्या 45 चेंडूतच त्याने शतक पूर्ण केले आणि 50 चेंडूत 10 चौकार व 7 षटकारांसह तो 106 धावांवर बाद झाला. हे आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

मयांकचे हे पहिलेच आयपीएल शतक होते मात्र त्याचा संघ किंग्ज इलेव्हनने यासह आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

आतापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक 13 शतकं राॕयल चॕलेंजर्सच्या फलंदाजांची होती.आता किंग्ज इलेव्हनच्या फलंदाजांचीही तेवढीच शतकं आहेत.

आयपीएलमधील संघनिहाय सर्वाधिक शतकंं

13- किंग्ज इलेव्हन
13- रॉयल चॕलेंजर्स
8- सुपर किंग्ज
8- दिल्ली कॅपिटल्स
6- राजस्थान रॉयल्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER