हिलटाॅपचा राजा: गणेशाचे विर्सजन रविवारी

hil top ka raja

नागपूर :- १५१ फुट उंच भव्यदिव्य रायगड किल्ला प्रतिकृती मंदिरात महाराष्ट्रात सर्वांत उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील हिलटाॅपचा राजा गणेश मूर्तीसह मुंबईतील लालबाग येथून आणलेल्या सात आकर्षक गणेश मूर्तीमध्ये विष्णू रूपात गणपती, माता स्वरस्वती रूपात गणपती, नाग रूपात गणपती, वाघावर स्वार गणपती, उंदीरावर स्वार गणपती, ब्रम्हा, विष्णू, महेश रूपात गणपती, शंकर भगवान रूपात गणेशांचे विर्सजन नागपूरच्या फुटाळा तलाव येथे १५ सप्टेंबर, रविवारी रात्री होणार आहे, अशी माहिती एकता गणेश उत्सव मंडळाचे मुख्य संयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

ही बातमी पण वाचा : नागपूर विभागातील १८ मोठी धरणे पूर्णतः भरली

यावेळी एकता गणेश उत्सव मंडळाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील गणेश व मुंबईतील लालबाग येथील सात श्रीगणेश मूर्तींचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी गृह मंत्री आमदार जयंत पाटील, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमीका साकारणारे सुप्रसिध्द अभिनेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे, प्रसिध्द प्रबोधनकार अमोल मिटकरी, देशातील प्रसिध्द गायक आनंद शिंदे, रिपाईचे नेते मनोज संसारेसह शासकीय वरिष्ठ अधिकारी आदींनी केले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुध्दा भव्य मिरवणुक हिलटाॅप येथून असून अंदाजे २ कि.मी. लांब असणा-या मिरवणुकीत घोडे, उंट, चालते ओर्केस्ट्रा, चालते लावणी नृत्य, चाळीसगाव बॅन्ड, संदल, प्रबोधनात्मक झांकीया आदी राहणार आहेत. फुटाळा तलाव येथे हिलटाॅपचा राजा व लालबाग येथील सर्व श्रीगणेश मूर्ती पोहचल्यानंतर महाआरती होणार व नंतर विर्सजन होणार आहे, आपल्या लाडक्या हिलटाॅपचा राजाच्या निरोपाला शहरातील लाखो नागरिक दरवर्षी प्रमाणे सहभागी होणार आहेत.

ही बातमी पण वाचा : लालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांत ६० लाखांचा दंड