किनाळा : सोयाबीन पिकाचे सर्वे करून शेतकर्याना नुकसान भरपाई दयावी – मा.जिप सदस्य टाकळीकर

किनाळा :- वार्ताहर-गेल्या तिन ते चार दिवसांपासून ढगफुटी होउन प्रंचड वादळी वा-यासह बिलोली-देगलुर विधानसभा मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे सर्वे करून शेतकर्याना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील टाकळीकर यांनी केले आहे.

बिलोली-देगलुर विधानसभा मतदारसंघात अती पाऊसाने मुग व उडीद पिक वाया गेले असताना शेतकरी आपल्या हातात सोयाबीन पिकतरी ऐईल अशा आशेवर असताना हाती येणारे सोयाबीन कित्येक शेतकर्यांनी सोयाबीन पिकाची कापणी करत असताना दि.9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ढगफुटी होउन मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले तर दुसर्या दिवसी पुन्हा झालेल्या पाउसाने हाती येणारे सोयाबीन अती पाऊसाने वाया गेल्यामुळे कित्येक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. अशा या नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या सोयाबीन पिकाचे शासनाने तात्काळ सर्वे करून शेतकर्याना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील टाकळीकर यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : १३०० वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे आहे हॉटेलची मालकी